
ज्याचा त्याचा चांदवा
₹220.00
कविता हा सर्वांत कठीण असा साहित्य प्रकार आहे, असे मी मानतो; एक तर कविता ही आत्मनिष्ठ असते, तसेच विचार, भावना, संवेदना, प्रतिक्रिया आणि सूक्ष्म निरीक्षणाचा गोळीबंद आविष्कार असते. ज्या कवीची स्वतःची खास अशी नजर असते, त्याची कविता भाऊगर्दीतही उठून दिसते आपल्या अंगभूत वेगळेपणानं! अशी मातीशी नातं सांगणारी, शहरी आणि ग्रामीण जीवनाचे अनुबंध उलगडणारी, अत्यंत तरलतेने मानवी मनाचा व नात्यांचा तळ शोधणारी आणि प्रत्येकाला आपल्या मनातल्या चांदव्याची भेट घडवणारी सहज, साधी, अन् तरीही सार्वत्रिक असणारी वेगळी कविता अंजली ढमाळ घेऊन आल्या आहेत.
लेखक : अंजली धमाल / Anjali Dhamal
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. 220