Sale!

सहजच सुचलं

100.00 50.00

माझ्या या पुस्तकाचं वर्णन करायचेच ठरवले तर मी असे करेन, एखाद्या मोठ्या पटांगणात उरूस (जत्रा) भरत असतो. सहसा दोन वर्तुळात दुतर्फा दुकाने थाटलेली असतात. या वर्तुळात प्रवेशासाठी दोन मार्ग असतात. आपण वर्तुळात प्रवेश करतो तेंव्हा सहसा (खरं तर उगीचच) डाव्या बाजूला वळून दुकाने पाहायला सुरुवात करतो. दुकानं सुरू होतात. लेडीज पर्सच्या दुकानानंतर भांड्याचे दुकान, मग खेळणीचे दुकान, पुढे जीन्स पॅन्ट, की चैन, स्त्रियांचे कपडे, बंदुकीने फुगे फोडणे, जादूगार, क्रॉकरी, हॉटेल, पन्नालाल गाढव, मेकअप, हसरे आरसे असे विविध पण एकमेकांशी काहीही संबंध नसलेली दुकाने लागतात. एका दुकानासमोरून जाईपर्यंत पुढचे दुकान कशाचे असेल? हे जसं माहित नसतं तसं एक प्रकरण वाचून झाल्यावर त्या नंतर चे प्रकरण कशावर लिहिलेलं असेल? हे सांगता येत नाही.

लेखक : विनोद डावरे / Vinod Daware
प्रकाशक : झपूर्झा सोशल फाऊंडेशन / Zapurza Social Foundation

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: Sahajach-Suchala-Vinod-Davare Category: Tag:

Description

साधारण जुन २०१६ पासून ”सहजच सुचलं” लिहायला लागलो. त्या आधीही सटर फटर लिहित होतो, उदय कातनेश्वरकर या लेखक मित्राने सल्ला दिला की असं बेसलेस लिहिण्यापेक्षा एक टायटल देऊन लिही, त्याचा सल्ला मानला आणि जन्म झाला, ”सहजच सुचलं” चा…
सुरुवातीला अडखळत लिहिणारा मी पुढे “सराईत” झालो. हळू हळू लोकप्रिय म्हणजे फेसबुक फ्रेंड प्रिय होऊ लागलो…
लिखाणात वेळेचे, वाराचे, तारखेचे जसे बंधन नव्हते तसे विषयाचेही नव्हते…
मनात जसे येईल तसे लिहीत गेलो, मनात जेंव्हा जे येईल ते लिहीत गेलो!
माझ्या या अशा फुटकळ लिखाणाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा दिली ती, डॉ. किशु पाल मॅडम मांनी, “स्वामींची मुंबईनगरी या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट चं स्क्रिप्ट त्यांनी
माझ्या कडून लिहून घेतले, आणि लिखाणाचे मानधन सुद्धा दिले. असो…
आता, माझ्या या पुस्तकाचं वर्णन करायचेच ठरवले तर मी असे करेन, एखाद्या मोठ्या पटांगणात उरूस (जत्रा) भरत असतो. सहसा दोन वर्तुळात दुतर्फा दुकाने थाटलेली असतात. या वर्तुळात प्रवेशासाठी दोन मार्ग असतात. आपण वर्तुळात प्रवेश करतो तेंव्हा सहसा (खरं तर उगीचच) डाव्या बाजूला वळून दुकाने पाहायला सुरुवात करतो. दुकानं सुरू होतात. लेडीज पर्सच्या दुकानानंतर भांड्याचे दुकान, मग खेळणीचे दुकान, पुढे जीन्स पॅन्ट, की चैन, स्त्रियांचे कपडे, बंदुकीने फुगे फोडणे, जादूगार, क्रॉकरी, हॉटेल, पन्नालाल गाढव, मेकअप, हसरे आरसे असे विविध पण एकमेकांशी काहीही संबंध नसलेली दुकाने लागतात. एका दुकानासमोरून जाईपर्यंत पुढचे दुकान कशाचे असेल? हे जसं माहित नसतं तसं एक प्रकरण वाचून झाल्यावर त्या नंतर चे प्रकरण कशावर लिहिलेलं असेल? हे सांगता येत नाही….
त्या मुळेच अनुक्रमणिका मधे काहीही न लिहिता फक्त क्रमांक टाकलेले आहेत. मुळात लिखाणालाच क्रम नाही तर अनुक्रमणिका कशी असू शकेल? आणि लिखाणाला क्रम नाही तर वाचण्यासाठी तरी का असावा? तुम्ही वाचलेल्या क्रमांकावर फक्त टिकमार्क करायचं आहे. उरुस कसा पाहायचा हे ज्याचं त्याने ठरवावं.
बुकमार्क ची गरजच नसलेलं हे पुस्तक तुमच्या टेबल वर असेल आणि पंख्याच्या वाऱ्याने पुस्तकाची पानं फडफडत असतील तर आहे तिथे फडफड थांबवून तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता. वाचनात व्यत्यय आलाच तर पुस्तक बंद करून पुन्हा जे पान हाती लागेल तिथून वाचायला सुरू करू शकता.

लेखक : विनोद डावरे / Vinod Daware प्रकाशक : झपूर्झा सोशल फाऊंडेशन / Zapurza Social Foundation

किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ५०/-

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क