संस्कृतीच्या प्रसादखुणा
₹100.00 ₹75.00
जीवनविषयक विचार धकाधकीच्या जीवनातही मनःशांती देऊ शकतात. असे विचार जे मला ऐकायला मिळाले, जे मला सुचत गेले ते साऱ्यांपर्यंत पोहोचावेत धर्म, संस्कृतीचं, दिखाव्याचं पोकळ स्वरूप जायं आणि त्याचा गाभा जो मानवी जीवनाशी, त्याच्या शारिरीक – मानसिक, भावनिक गरजांशी निगडीत आहे त्याचा विचार व्हावा यासाठी हा लेखन प्रपंच!
प्रथम ‘सह्याद्री’ आणि नंतर ‘केसरी’ या वृत्तपत्रातून ‘शुभंकरोति’ या नावाने हे लेख जवळजवळ चार वर्षे प्रसिद्ध होत होते.
लेखिका : सौ. राजलक्ष्मी देशपांडे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
मानवी सामर्थ्याला विज्ञानाच्या शोधांची साथ मिळाली आणि पहिल सुखसमाधानांच्या दृष्टीनं त्याचं आयुष्य सुखी झालं बुरसटलेल्या धार्मिक कल्पना, अन्याय्य रूढी, रीती नव्या सामाजिक जाणीवांमुळे शिक्षणपद्धतीमुळे नष्ट झाल्या आणि थोडा मोकळा श्वासही त्याला घेता येऊ लागला, जीवनाच्या गतीबरोबर कितीतरी जुन्या गोष्टी वाहून गेल्या. त्यात स्त्रियांचं दास्य, जातिभेद, निरर्थक कर्मकांड हे गेल्यानं समाजात चांगले बदल झाले, पण मन:शांती देणारे, उमे राहायचं बळ देणारे विचारही या गतीबरोबर वाहून गेले आणि मानवी जीवन भरकटत चाललं, यातून एकीकडे चंगळवाद, त्याबरोबर येणारी अपरिहार्य अनैतिकता आणि देवळांपुढे मात्र वाढत्या रांगा, पुन: एकदा कर्मकांडाला येत चाललेलं महत्त्व पण भावशून्य धार्मिक व्यवहार असं विसंवादी दृश्य दिसु लागलं, तेव्हा मनावर लहानपणापासून झालेले संस्कार जागे झाले. रूही किंवा कर्मकांडामागे असलेला तत्त्वविचार कोणता हे कळलं, तर काय त्याज्य आहे आणि कोणतं मुल्य चिंतन आहे हे कळू शकतं. आणि हे जीवनविषयक विचार धकाधकीच्या जीवनातही मनःशांती देऊ शकतात असे विचार जे मला ऐकायला मिळाले, जे मला सुचत गेले ते साऱ्यांपर्यंत पोहोचावेत धर्म, संस्कृतीचं, दिखाव्याचं पोकळ स्वरूप जायं आणि त्याचा गाभा जो मानवी जीवनाशी, त्याच्या शारिरीक – मानसिक, भावनिक गरजांशी निगडीत आहे त्याचा विचार व्हावा यासाठी हा लेखन प्रपंच!
लेखिका : सौ. राजलक्ष्मी देशपांडे
sanskrutichya-prasadkhuna-by-rajalaxmi-deshpande
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com