Sale!

विक्रीआधी स्वसंवाद – Self Talk before Sales Talk

₹100.00 ₹80.00

सेल्स व मार्केटिंगच्या व्याख्येमध्ये पुष्कळच वल्गना असतात. विक्रेत्यांना ह्या शब्दाबाबत नेहमीच गोंधळ वाटत असतो. काहीजण मार्केटिंगला मार्केटिंगमधील रिसर्च म्हणतात, तर काही त्याला सर्व्हे म्हणतात. लेखकाने सोप्या शब्दात काही मनोरंजक उदाहरणांवरून हा गोंधळ घालविण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या पुस्तकांत वेगवेगळ्या सहा घटनांचा सखोल परामर्श घेऊन विक्रेत्याच्या मनांतील नकारात्मक विचार परत दुसऱ्या बाजूने विचार करत सकारात्मक विचारात कसे बदलू शकतात, ह्याची अभ्यासपूर्वक चर्चा केलेली आहे.

विक्रेत्यांनी वेळोवेळी पाळावयाची पथ्ये व मनाची उभारणी ह्यावर भर दिलेला आहे. रुक्ष असलेला विषय रंजक होण्यासाठी मध्ये मध्ये विक्रीविषयक व इतरही मनोरंजक माहिती आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी दिलेली आहे.

लेखक : चंद्रशेखर राजे
इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

किंमत : रु. 100
सवलत किंमत : रु. 80

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

SKU: vishwakarma-full-mss-new-1 Category: Tags: ,

Description


हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.


लेखक :चंद्रशेखर राजे

इ-पुस्तक निर्मिती : मराठीसृष्टी

प्रस्तावना

मित्रांनो, हे पुस्तक आपल्यासमोर ठेवताना मला आनंद होत आहे. ह्या पुस्तकात थोडे वेगळेपण आहे. हे मॅनेजमेंट स्कूलला लागणाऱ्या पाठ्यपुस्तकासारखे नाही. एखाद्या थोर मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकासारखे हे पुस्तक नाही, तर माझ्या अनेक वर्षांच्या विक्रीच्या अनुभवांतून, व्यावहारिक अनुभवातून उतरलेल्या नेहमीच्या प्रसंगातून ह्या पुस्तकाची उभारणी झाली आहे.

सेल्स व मार्केटिंगच्या व्याख्येमध्ये पुष्कळच वल्गना असतात. विक्रेत्यांना ह्या शब्दाबाबत नेहमीच गोंधळ वाटत असतो. काहीजण मार्केटिंगला मार्केटिंगमधील रिसर्च म्हणतात, तर काही त्याला सर्व्हे म्हणतात. मी सोप्या शब्दात काही मनोरंजक उदाहरणांवरून हा गोंधळ घालविण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या पुस्तकांत वेगवेगळ्या सहा घटनांचा सखोल परामर्श घेऊन विक्रेत्याच्या मनांतील नकारात्मक विचार परत दुसऱ्या बाजूने विचार करत सकारात्मक विचारात कसे बदलू शकतात, ह्याची अभ्यासपूर्वक चर्चा केलेली आहे.

विक्रेत्यांनी वेळोवेळी पाळावयाची पथ्ये व मनाची उभारणी ह्यावर भर दिलेला आहे. रुक्ष असलेला विषय रंजक होण्यासाठी मध्ये मध्ये विक्रीविषयक व इतरही मनोरंजक माहिती आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी दिलेली आहे.

हे पुस्तक सादर करताना काही माहिती इंटरनेटच्या आधारे गोळा केलेली आहे. काही तज्ज्ञ लेखकांच्या पुस्तकाचा स्वैर आधार घेतलेला आहे. त्या लेखकांत ‘डॉ. मार्टी सेल्डमन’ व ‘पिटर हर्श’ ह्यांचा नामोल्लेख करावयास हवाच. त्यांचा मी मनापासून ऋणी आहे.

पुष्कळशी माहिती मूळ इंग्रजीत असल्यामुळे अनेक शब्द तसे आलेले आहेत. सेल्स आणि मार्केटिंगच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी अनेक इंग्रजी योग्य मराठी शब्द मागे परिशिष्टात दिलेले आहेत. त्याचा वाचकांस जरूर उपयोग होईल.

मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असून मला अनेक मोठ्या कंपन्यामध्ये काम करावयास मिळाले व अनेक खात्यांमध्ये प्रदीर्घ अनुभव घेऊन मी शेवटची २५ वर्षे सेल्स व मार्केटिंग खात्यामध्ये खराखुरा अनुभव घेतला.

भारतात व भारताबाहेर पुष्कळ प्रवास झाला. अनेक प्रांत, लोक, त्यांच्या वागण्याच्या, कामाच्या तऱ्हा ह्यांचा जवळून अभ्यास केला व अखेरीस काही मित्रांच्या सांगण्यावरून ह्या पुस्तकाचा जन्म झाला.

हे माझे पहिलेच पुस्तक आहे. मला खात्री आहे की सोप्या, रंजक भाषेत लिहिलेले हे पुस्तक वाचकांस नक्कीच आवडेल. संदर्भासाठी म्हणून हे पुस्तक हे जवळ ठेवण्यास हरकत नाही.

शेवटी वाचकांस ही विनंती की, आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. त्या कळविल्याने मला आनंद होईल; कारण पुस्तकनिर्मितीतून काही लोकांनी जरी लाभ घेतला तरी माझे श्रम सार्थकी लागतील.

– लेखक

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

लेखक संपर्क

पुस्तक वाचा

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.