
येरू म्हणे
₹100.00
प्रवीण बांदेकर यांची ही कविता एका कवीच्या आंतरिक कल्लोळाच्या वर्तमानाची कविता आहे. तिचे नाते कणाकणाने प्रवाहित होत, शतकांमधून पाझरत आपल्यापर्यंत आलेल्या तुकोबाच्या कवितेशी आहे.
आयुष्य जगताना आरंभीची कोवळीक मिटत जाऊन निबर होत जाणे असा संस्कार उरतो हे खरे असले तरी कोवळीकीचे भान संपत नाही, वाहणे; वाहण्याची आकांक्षा करणे संपत नाही व म्हणूनच कोलाहलाचे हलाहल पचवूनही शांतपणे झोपता येत नाही हे कवी असण्याचे अस्सल प्रारब्ध ही कविता अत्यंत ठसठशीतपणे व्यक्त करते.
लेखक : प्रवीण बांदेकर / Pravin Bandekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 71
किंमत : रु. 100