पुस्तक परिचय-परिक्षणे

आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य ‘मुंबई दिनांक:’ या दोन शब्दांनी सुरु होणार्‍या बातम्या लिहिण्यातचं गेलं, त्यामागे या पुस्तकाचीच प्रेरणा कारणीभूत होती. आज या पुस्तकाचं कथानक महाराष्ट्रातल्या घराघराला ठाऊक झालं आहे. १९७२ साली ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि नंतरच्या पाच वर्षातच साधूंची ‘सिंहासन’ ही आणखी एक कादंबरी आली. त्या दोहोंच्या उत्कृष्ट मिलाफातून जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ हा चित्रपट काढला आणि या दोन्ही कादंबर्‍या घराघरांत जाऊन पोहोचल्या. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

पानिपत – विश्वास पाटील

बहुतेक इतिहासकालीन कादंबर्‍या वा नाटकं गतकालाचा गौरव करणार्‍या असतात. पानिपत अशा सर्व साहित्यापेक्षा वेगळी ठरते, याचं कारण पाटील हे सतत भूत-वर्तमान आणि भविष्य यांचं भान ठेवून या महासंग्रामाकडे पाहत राहिले आणि त्यातूनच मराठी लष्कर, त्याबरोबर गरज नसताना पुण्याहून गेलेले आणि पुढे अत्यंत अडचणीचे ठरलेले कुटुंबकबिले व बाजारबुणगे यांची हजारो मैलांची दौड आणि त्यांना पाठीशी घालत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेली लढाई यांचं अत्यंत प्रत्ययकारी तसंच वास्तवदर्शी चित्रण उभं राहिलं. […]