मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजाराहून जास्त पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या काही हजारांच्या आसपास जाईल. कदाचित मराठीतील सर्व पुस्तकांची संख्या काही लाखातही असण्याची शक्यता आहे.

दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तकांची माहिती कोणत्याही ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही. पुस्तक प्रकाशकांचा ऑनलाईन माध्यमांकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनपर्यंत थोडा संकुचित असल्यासारखा वाटतो. मराठी प्रकाशकांमध्ये या माध्यमाविषयी गैरसमजही असलेले दिसतात. त्यामुळे बरीच पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुस्तकविषयक वेबसाईटसमध्ये आघाडीवर असलेल्या बुकगंगा, रसिक, फ्लिपकार्ट वगैरे साईटसमध्ये त्या साईटसवर विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांचीच माहिती दिलेली दिसते. जी पुस्तके विक्रीसाठी नाहीत त्यांची माहिती उगाच का ठेवावी असा विचार कदाचित या वेबसाईटस करत असतील.

पुस्तके आणि प्रकाशन व्यवसायविषयक माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातून काही मासिके प्रकाशित होत असतात.  मेहतांचे “मेहता ग्रंथजगत”, मॅजेस्टिकचे “ललित” यासारखी मासिके नवीन आलेल्या पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतात. मात्र यात मुख्यत त्यांच्या स्वत:च्या प्रकाशनांची माहिती जास्त असते.

बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक अजूनही जन्माला यायचे आहे. आणि खरोखरच असे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. त्यात पुन्हा जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रती छापायला लागणार आणि ते खर्चिक काम होणार.

ही अडचण फक्त आणि फक्त ऑनलाईन माध्यमाद्वारेच दूर होऊ शकते हे आता तरी प्रकाशन व्यवसायातील धुरिणांनी समजून घेतले पाहिजे आणि आपली ऑनलाईन माध्यमांकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने “www.marathibooks.com” या पुस्तक आणि प्रकाशन विश्वासाठीच्या मेगा-पोर्टलची निर्मिती होत आहे. पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही असे या मेगा-पोर्टलचे स्वरुप आहे. या मेगा पोर्टलची काही खास, ठळक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


ठळक वैशिष्ट्ये

सर्व प्रकाशकांच्या पुस्तकांची माहिती एकाच ठिकाणी
पोर्टलवर पुस्तक विक्रीसाठी आहे किंवा नाही यावर माहिती प्रसारण अवलंबून नाही
लेखक-निहाय, प्रकाशक-निहाय, विषय-निहाय पुस्तक सूची
मराठी आणि इंग्रजीतून पुस्तकांचा शोध घेणे शक्य
प्रकाशकांसाठी पुस्तकाची माहिती मोफत देण्याची सोय
प्रकाशकांना ऑनलाईन विक्रीसाठी पुस्तके ठेवण्याची सोय
प्रकाशकांना त्यांच्या ऑनलाईन खरेदीच्या पानावर नेण्यासाठी अत्यल्प दरात सोय.
पुस्तकाच्या खास प्रमोशनसाठी अत्यल्प दरात सोय
सुमारे एक लाखाहून जास्त नियमित वाचक
वाचकांना आवडलेल्या पुस्तकांवर प्रतिक्रिया देण्याची सोय
पोर्टलवर माहिती उपलब्ध नसलेल्या पुस्तकांची माहिती देण्याची वाचकांना सोय
साप्ताहिक न्यूजलेटरद्वारे बाजारात नवीन आलेल्या पुस्तकांची वाचकांपर्यंत माहिती
वाचकांना त्यांच्याकडील जुनी / अतिरिक्त पुस्तके विकण्यासाठी मदत