Sale!

असा मी…. दादा कोंडके

100.00 75.00

हे दादांचे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या कला कर्तृत्वाला यात निश्चित उजाळा मिळाला आहे.

दादांच्या सहवासात आल्यानंतर मी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी दिलखुलास बातचीत करून अनेक लेख लिहिले. त्यांना काही खास विषय देऊन त्यावरील त्यांच्या मतांचे, विचारांचे, आठवणींचे शब्दांकन केले. या लेखांना उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे ते पुस्तकरूपाने दादांच्या चाहत्यांसमोर यावे असे मला वाटले. त्यांनाही तसे वाटत होते.

दादांनी आपल्या चाहत्यांशी सरळ संवाद साधलेले हे सर्व लेख ‘रसरंग’ या लोकप्रिय साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले असले तरी ते एकत्रित वाचकांसमोर आल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल असे त्यांना वाटल्याने मी त्या दृष्टीनेच तयारी केली.

दादा कोंडके या मराठी चित्रसृष्टीतील चमत्काराचे महात्म्य अजूनही शाबूत आहे म्हणून त्यांच्या चाहत्यांना ही दादांच्या आठवणीची साठवण निश्चित आवडेल अशी मला खात्री वाटते.

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : वसंत भालेकर

प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: asa-mee-dada-kondke Categories: , Tag:

Description

हे दादांचे आत्मचरित्र नाही पण त्यांच्या कला कर्तृत्वाला यात निश्चित उजाळा मिळाला आहे.

दादा सिनेमाच्या कॅमेऱ्यापुढे जाण्यापूर्वीपासून मी त्यांना ओळखत होतो. त्यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या भन्नाट मुक्त नाट्यामुळे ही ओळख अधिक दृढ झाली आणि त्यांच्या ‘सोंगाड्या’ या पहिल्याच चित्रपटाला विक्रमी यश मिळाल्यानंतर तिचे मैत्रीत रूपांतर झाले. आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. त्यांच्या मर्जीतील खास मंडळींपैकी मी एक ठरलो. दादा माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलू लागले.

दादांच्या सहवासात आल्यानंतर मी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी दिलखुलास बातचीत करून अनेक लेख लिहिले. त्यांना काही खास विषय देऊन त्यावरील त्यांच्या मतांचे, विचारांचे, आठवणींचे शब्दांकन केले. या लेखांना उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे ते पुस्तकरूपाने दादांच्या चाहत्यांसमोर यावे असे मला वाटले. त्यांनाही तसे वाटत होते.

पण दादा अकस्मात चालता बोलता आमच्यातून निघून गेल्यामुळे आता ते या आठवणींच्या आणि त्यांच्या जनमान्य हिंदी-मराठी चित्रपटांच्या रूपाने आपल्यात राहिले आहेत.

दादांनी आपल्या चाहत्यांशी सरळ संवाद साधलेले हे सर्व लेख ‘रसरंग’ या लोकप्रिय साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले असले तरी ते एकत्रित वाचकांसमोर आल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल असे त्यांना वाटल्याने मी त्या दृष्टीनेच तयारी केली.

दादा कोंडके या मराठी चित्रसृष्टीतील चमत्काराचे महात्म्य अजूनही शाबूत आहे म्हणून त्यांच्या चाहत्यांना ही दादांच्या आठवणीची साठवण निश्चित आवडेल अशी मला खात्री वाटते.

लेखक : वसंत भालेकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Asa Mee – Dada Kondke
Vasant Bhalekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com

पुस्तक वाचा