श्री गणेश पुराण
₹0.00
हे व्हिडिओ पुस्तक मोफत पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही. श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसाठी तयार करण्यात आलेल्या विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या मधुर वाणीतील ‘श्री गणेश पुराण’ या प्रवचन मालिकेचे ‘मराठीसृष्टी’ निर्मित हे व्हिडिओ पुस्तक.
लेखक : प्रा. स्वानंद पुंड / Prof Swanand Pund
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
Description
विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांनी लिहिलेली प्रस्तावना
सर्वपूज्य सर्वादीपूज्य भगवान श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते दैवत. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही.
भगवान श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण, तर भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूपाला सुस्पष्ट करणारा ग्रंथ म्हणजे श्री मुद्गल पुराण.
सोमकांत नावाच्या राजाला महर्षी भृगुंनी केलेला उपदेश आहे श्री गणेश पुराण. यामध्ये भगवान गणेशांचे माहात्म्य, विविध गणेश क्षेत्रांच्या निर्मिती कथा, त्यानिमित्ताने विविध ईश्वर-महेश्वरांनी केलेली गणेश उपासना, श्री गणेशांच्या विविध भक्तांच्या कथा, चतुर्थीची कथा, शमी, मंदार, दूर्वा माहात्म्य सांगणाऱ्या कथा तथा श्री गणेश नामाचे महत्त्व अशा विविध गोष्टी पहिल्या उपासना खंडात वर्णन करण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या क्रीडा खंडात कृतयुगातील विनायक, त्रेतायुगातील मयुरेश्वर तथा द्वापार युगातील गजानन अवताराच्या कथा वर्णन केलेल्या आहेत.
अर्थात पुराणकथा केवळ वरपांगी वाच्यार्थानेच वाचत गेल्या तर त्या चित्रविचित्र काल्पनिक वाटू शकतात. मात्र कथा कशी आहे ? यापेक्षा, ती तशी का आहे? याचे चिंतन करून तो भाव समजून घेतला तर मग प्रत्येक कथा आपल्यासाठी आत्मविकासाचा नवीन मार्ग ठरते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट साठी तयार करण्यात आलेल्या या प्रवचन मालिकेत नेमकी हीच भूमिका घेऊन श्री गणेश पुराणाच्या प्रत्येक भागाचे वर्णन करण्यात आलेले आहे.
श्री निनाद प्रधान यांच्या माध्यमातून मराठीसृष्टीवर या सर्व प्रवचनांची ही मालिका आपल्याला या वेगळ्या पद्धतीने उपलब्ध होत आहे हा आनंदाचा विषय आहे.
शक्य त्या प्रत्येक मार्गाने प्रत्येक गणेश भक्तापर्यंत श्री गणेश माहात्म्य पोहोचावे हीच प्रभु सेवा. श्री गुरूंची सेवा.
आज माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. त्याचप्रमाणे आमचे श्री गुरु परमपूज्य स्वानंदवासी गणेश तत्वज्ञान पंडित श्री गजानन महाराज पुंड शास्त्री यांची देखील जयंती.
भगवान श्री गणरायांच्या तथा श्री गुरूंच्या चरणी ही नूतन माध्यम सेवा सादर समर्पित.
माझ्या मोरयाचा धर्म जागो !
जय गजानन.
स्वानंद गजानन पुंड
९८२२६४४६११
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीचाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com