उगम
₹250.00
नारवक्कम हे दक्षिणेतलं, समुद्रकिनाऱ्यावरचं चर्चेस, मंदिर-गोपुरांचं वाऱ्यावर झुलणारं, हिरवंशार छोटंसं गाव. ते नुसतं गावच नाही तर सरवणा आणि व्हिक्टर या बालमित्रांच्या अबोध मैत्रीचा हा आरंभ-रुजवात आहे. चर्चचे ग्रेव्हयार्ड, त्याच्या बाजूच्या उपसागरावरच्या रेल्वेब्रिजवरून दूरवर जाताना दिसणारी गाडी, हा या कथेचा मर्माचा संकेत.
स्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेनं जाणारी कादंबरी, त्यांची कादंबरीकार म्हणूनही ओळख दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करणारी…
लेखक : मोनिका गजेंद्रगडकर / Monika Gajendragadkar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh
पाने : २३६
किंमत : रु. २५०/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१०७-५
Description

व्हिक्टरच्या मृत्यूने ही कथा अधिकच गहिरी होते आणि पाण्याला स्वत:चा ओघ मिळावा, तशी मुंबईसारख्या अजस्र महानगरात, मदर सिल्व्हियांमधल्या आईपणाच्या उद्भवात जाणतेपणाने मिसळून अथांग होत जाते. कादंबरीचे हे दोन आरंभबिंदू असे जोडले जातात. स्त्रीच्या सृजनाच्या अद्भुत ताकदीचा नि दुसरीकडे माणसाच्या मुळांचा ठाव घेत, अपार करुणेने त्याच्या मनाचाही तळ शोधणारी ही कादंबरी. ही कादंबरी माणूसपणाची बीजं पेरणारा म्हणून धर्म या संकल्पनेचा एक वेगळा अर्थही लावू पाहते.
स्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेनं जाणारी कादंबरी, त्यांची कादंबरीकार म्हणूनही ओळख दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करणारी…
— आशा बगे
लेखक : मोनिका गजेंद्रगडकर / Monika Gajendragadkar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh
पाने : २३६
किंमत : रु. २५०/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१०७-५
Monika Gajendragadkar
Ugam
Mauj Prakashan Gruha
लेखक संपर्क
८, तरंग बिल्डिंग, मुंबई तमिळ संघ मार्ग, २२४, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२फोन - (०२२) २४०९ २९२६
इमेल - monikagadkar@gmail.com
प्रकाशक संपर्क
मौज प्रकाशन गृह, मुंबई
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९