मुक्या वेदना बोलक्या संवेदना

400.00

पशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं हे आयुष्याचं ध्येय मानणाऱ्या विनया जंगले…त्यांचं स्वानुभवांवर आधारित ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ हे आगळं पुस्तक.

लेखक : डॉ. विनया जंगले / Dr Vinaya Jangale
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : २३२
किंमत : रु. ४००/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९४-५

Description

पशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं हे आयुष्याचं ध्येय मानणाऱ्या विनया जंगले… त्यांचं स्वानुभवांवर आधारित ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ हे आगळं पुस्तक.

पशुवैद्य या भूमिकेत वावरताना प्राण्यांवर केवळ उपचार न करता, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवणं हाही त्यांच्या व्यवसायाचा आणखी एक पैलू. पण विविध प्राण्यांना तपासताना त्या प्राण्यांच्या संवेदनांशी एकरूप होणारी विनया जंगले या व्यक्तीमधील मानवतावादी दृष्टी या पुस्तकात ठळकपणे जाणवत राहते. म्हणूनच या प्राण्यांशी त्यांच्या वेदना समजून घेताघेता जुळत गेलेले भावबंधही त्यांच्या लेखनाचं नजरेत भरणारं वैशिष्ट्य ठरतं.

आपली ज्ञानशक्ती पणाला लावताना सूक्ष्म निरीक्षणातून आणि उत्कट भाववृत्तीतून त्यांनी नोंदवलेली ही अनुभवांची क्षणचित्रं विलक्षण बोलकी होतात. आणि विनया जंगले यांच्यातील लेखिका ही प्रतिमाही अधोरेखित होत जाते.

साध्या, संवादी शब्दशैलीतून सजीवपणे साकार होत जाणारं हे वन्यप्राणीजीवन नकळतपणे ललितगद्याची भावविभोर अशी रूपंच ठरतात.


लेखक : डॉ. विनया जंगले / Dr Vinaya Jangale
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh

पाने : २३२
किंमत : रु. ४००/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९४-५

Mukya Vedana Bolakya Sanvedana
Vinaya Jangale
Mauj Prakashan Gruha

लेखक संपर्क

लेखक : डॉ. विनया जंगले / Dr Vinaya Jangale

प्रकाशक संपर्क

मौज प्रकाशन गृह, मुंबई
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९