


मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने "पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही" असे हे मेगा-पोर्टल !
Copyright © 2020 | Marathisrushti.com